नवी दिल्ली - दिल्ली मेट्रोचे माजी प्रमुख आणि मेट्रो मॅन या नावाने प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी महिलांना मोफत मेट्रो प्रवास योजनेला चुकीचे ठरवताना या योजनेला रद्द करण्याची अपील केली आहे.
महिलांना मोफत प्रवासाबाबत दिल्लीच्या 'मेट्रो मॅन'चे नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाले...
ई. श्रीधरन यांनी १० जूनला नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला सहमती देवू नये, असे सांगितले आहे. समाजातील एका घटकाला अशी सवलत दिल्यास विद्यार्थी, अपंग आणि वृद्ध नागरिकही सवलतींची मागणी करतील.
ई. श्रीधरन यांनी १० जूनला नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला सहमती देवू नये, असे सांगितले आहे. त्यांनी लिहिले, की समाजातील एका घटकाला अशी सवलत दिल्यास विद्यार्थी, अपंग आणि वृद्ध नागरिकही सवलतींची मागणी करतील. वास्तविक पाहिले तर, महिलांपेक्षा तेच हकदार आहेत. अशी योजना सुरू केल्यास देशातील दुसऱ्या शहरातील मेट्रोतही अशा योजना पसरतील. या योजनेमुळे दिल्ली मेट्रोचे दिवाळे निघेल. जर, दिल्ली सरकार महिला प्रवाशांची मदत करू इच्छिते तर त्यांनी त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. मेट्रोचे कर्मचारीसुद्धा पैसे देवून प्रवास करतात. ही योजना सुरू केल्यास १ हजार कोटींचा खर्च येईल आणि तो वाढतच जाईल.
मेट्रो सुरू झाल्यानंतर कोणालाही सवलत द्यायची नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही स्वागत केले होते. दिल्ली मेट्रो केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्या सहयोगामुळे बनली आहे. त्यामुळे कोणी एक असा निर्णय घेवू शकत नाही, असेही श्रीधरन यांनी पत्रात लिहिले आहे.