हैदराबाद- जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, सामाजिक अंतर ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे नागरिकांच्या दैनंदिन नित्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
कोरोनाचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम, १८८ देशांतील शाळा बंद - १८८ देशांतील शाळा बंद
युनेस्कोच्या माहितीनुसार, ८ एप्रिलपर्यंत जगभरातील १८८ देशांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यात जवळपास ९० टक्के म्हणजेच १.५ मिलीयन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. जागतिक पातळीवर शिक्षणात येणारा व्यत्यय अतुलनीय असल्याचे युनेस्कोचे महासंचालक जनरल ऑड्रे अझोले यांनी म्हटले आहे.

या परिस्थितीत मुलांच्या आणि तरुणांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. युकेमधील एका संस्थेने याबद्दल २ हजार १११ तरुणांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार, यावर ८३ टक्के तरुणांनी सांगितले की, या विषाणूने त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. तर, २६ टक्के तरुणांनी म्हटले, की अशा परिस्थितीत त्यांचे मानसिक आरोग्य स्थिर राहात नाहीये. एकंदरीतच या विषाणूचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.