महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मेलानिया ट्रम्प यांची दिल्लीतील शाळेला भेट; गाणे, गप्पागोष्टी करत विद्यार्थ्यांशी साधला संवाद - melania trump visits to school

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी नानकपुरा येथील विद्यालयातील हॅपिनेस क्लासला भेट दिली.

मेलानिया ट्रम्प यांची दिल्लीतील शाळेला भेट
मेलानिया ट्रम्प यांची दिल्लीतील शाळेला भेट

By

Published : Feb 25, 2020, 2:47 PM IST

Updated : Feb 25, 2020, 3:22 PM IST

नवी दिल्ली -अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी नानकपुरा येथील सर्वोदय प्राथमिक शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीत गाऊन त्यांचे स्वागत केले. गाणे, गप्पा, गोष्टी करत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मेलानिया ट्रम्प यांची दिल्लीतील शाळेला भेट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी नानकपुरा येथील को-एड उच्च प्राथमिक विद्यालयातील हॅपिनेस क्लासला भेट दिली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ही एक सुंदर शाळा आहे. पारंपारिक नृत्य सादर करून माझे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. माझी भारतातील ही पहिलीच भेट आहे. येथील लोक खूप स्वागतार्ह आणि उत्साही आहेत. आम्ही दोघेही येथील स्वागताने भारावून गेलो आहोत.

दिल्लीतील सरकारी शाळेत गेल्या दीड वर्षापासून हॅपिनेस क्लास घेण्यात येत आहे. या क्लास अंतर्गत देण्यात येणाऱ्या विशेष ज्ञानामुळे याला हॅपिनेस क्लास असे म्हटले जाते. केजरीवाल यांनी ही मेलेनिया यांचे शाळेला भेट दिल्याबद्दल आभार मानले आहे.

Last Updated : Feb 25, 2020, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details