महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भगव्या जर्सीवरुन मी तर फक्त गंमत केली,' मेहबूबा मुफ्तींनी मारली पलटी - pdp

मुफ्ती यांनी 'भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली,' असे ट्विट केले होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर 'मी फक्त गंमत केली' म्हणत त्यांनी पलटी मारली आहे.

मेहबूबा मुफ्ती

By

Published : Jul 1, 2019, 9:33 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरुन मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. विश्वकरंडकात ब्रिटनकडून एका सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही या वादात उडी घेतली होती. त्यांनी 'भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली,' असे ट्विट केले होते. मात्र, या टि्वटचा सोशल मीडियावर जोरदार समाचार घेण्यात आल्यानंतर त्यांनी 'मी फक्त गंमत केली,' असे म्हणत पलटी मारली आहे.

मेहबूबा यांनी स्वतःच्या ट्विटचा बचाव करताना भाजप कार्यकर्त्याच्या वादग्रस्त ट्विटचे उदाहरण दिले आहे. एका भाजप नेत्याकडून हिंदुंना मुस्लिम महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले जाते. पण या टि्वटपेक्षा मी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल गमतीने केलेल्या टि्वटची जास्त चर्चा होते. अशी धक्कादायक विधाने जाणीवपूर्व दाबली जातात का? एका साध्या टि्वटवर इतक्या कठोर प्रतिक्रिया येतात पण भाजप नेत्याच्या टि्वटवर संताप का व्यक्त होत नाही? असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.

'मला अंधश्रद्धाळू म्हटले तरी हरकत नाही. मात्र, भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली,' असे ट्विट मुफ्ती यांनी केले होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर 'मी फक्त गंमत केली' म्हणत त्यांनी पलटी मारली आहे. त्यांच्या ट्विटनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मेहबूबा यांना मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही मेहबूबा यांच्यावर टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details