श्रीनगर - केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा बलांच्या १०० तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाच्या या निर्णयावर पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैझल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मेहबुबा मुफ्तींनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक करताना म्हटले, की सुरक्षा बलाच्या अतिरिक्त तुकड्यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात सुरक्षा बलाच्या जवानांच्या कोणतीही कमी नाही. जम्मू-काश्मीरची समस्या राजकीय आहे. सैन्याच्या माध्यमातून ही समस्या सुटणार नाही. सरकारला त्यांच्या धोरणावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे.