महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसने काढले आमदारांसाठी परिपत्रक, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग - बंगळुरु

मी भाजप बरोबर जाणार नाही. आमचे युतीचे सरकार राज्याच्या भल्यासाठी आहे. जर माझ्या पक्षाचे म्हणने असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे.  अशी प्रतिक्रीया शिक्षण मंत्री जी.टी. देवेगौडा यांनी दिली. दोन्ही पक्षांनी ठरवले असेल तर सिद्धरमय्या मुख्यमंत्री व्हावेत किंवा आणखी कोणी तर मला काहीच अडचण नाही. काँग्रेस  सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

काँग्रेसने काढले आमदारांसाठी परिपत्रक, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग

By

Published : Jul 8, 2019, 2:13 AM IST

Updated : Jul 8, 2019, 7:48 AM IST

बंगळुरु - कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. बंगळुरूमध्ये राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. ९ जुलैला काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. यासाठी पक्षाने परिपत्रक काढले आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सर्व आमदारांची बैठक कुमारस्वामी यांनी बोलावली आहे. जे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी केसी वेणुगोपाल आणि कर्नाटक काँग्रेस प्रमुख दिनेश गुंडू या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपनेही सोमवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक आयोजित केली आहे.

मी भाजप बरोबर जाणार नाही. आमचे युतीचे सरकार राज्याच्या भल्यासाठी आहे. जर माझ्या पक्षाचे म्हणने असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री जी. टी. देवेगौडा यांनी दिली. दोन्ही पक्षांनी ठरवले असेल तर सिद्धरामय्या मुख्यमंत्री व्हावेत किंवा आणखी कोणी तर मला काहीच अडचण नाही. काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Last Updated : Jul 8, 2019, 7:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details