महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 14, 2019, 12:57 PM IST

ETV Bharat / bharat

मी 'त्यांना' फाशी देण्यास आतुर, अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य - जल्लाद पवन

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्यास आतुर असल्याचे उत्तर प्रदेशातील जल्लाद पवन यांनी म्हटले आहे. ते सध्या ५५ वर्षांचे असून मेरठ तुरुंगाचे जल्लाद आहेत. 'त्या' चार जणांना फाशी देण्याची संधी मिळाल्यास आपल्याला आनंद होईल, असे ते म्हणाले.

मी 'त्यांना' फाशी देण्यास आतुर, अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य - जल्लाद पवन
मी 'त्यांना' फाशी देण्यास आतुर, अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य - जल्लाद पवन

मेरठ - निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्यास आतुर असल्याचे उत्तर प्रदेशातील जल्लाद पवन यांनी म्हटले आहे. मेरठचे रहिवासी असलेल्या पवन यांनी आपणे स्वेच्छेने या गुन्हेगारांना फाशी देण्यास तयार असल्याचे ईटीव्हीशी बोलताना सांगितले. 'त्या' चार जणांना फाशी देण्याची संधी मिळाल्यास आपल्याला आनंद होईल, असेही ते म्हणाले.

पवन सध्या ५५ वर्षांचे असून ते मेरठ तुरुंगाचे जल्लाद आहेत. तर, निर्भया प्रकरणातील गुन्हेगार दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत आहेत. तिहारमध्ये फाशी देण्यासाठी जल्लाद उपलब्ध नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यानंतर इतर ठिकाणाहून जल्लाद मागवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेरठच्या पवन जल्लाद यांना आपल्याला या चार जणांना फाशी देण्यासाठी बोलावले जाईल, अशी आशा आहे.

मी 'त्यांना' फाशी देण्यास आतुर, अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य - जल्लाद पवन

आजोबा कल्लू यांच्याकडून फाशी द्यायला शिकले

पवन यांनी आपले आजोबा कल्लू जल्लाद यांच्याकडून फाशी द्यायला शिकल्याचे सांगितले. कल्लू जल्लाद यांना वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये फाशी देण्यासाठी बोलावले जात असे. यानंतर पवन यांचे वडील मम्मू जल्लाद यांनी हा वारसा पुढे चालवला. यानंतर पवन जल्लाद यांनी हा वारसा उचलला आहे.

पवन त्यांचे आजोबा कल्लू जल्लाद यांच्यासोबत तुरुंगांमध्ये जात असत. आजोबा गळफास कसा तयार करतात हे त्यांनी पाहिले होते. तसेच, फाशी कशा प्रकारे दिली जाते, हेही त्यांनी पाहिले होते. त्यांचे आजोबा कल्लू जल्लाद यांनीच रंगा बिल्ला या गुन्हेगारांना फाशी दिली होती. याशिवाय, पवन पतियाळामध्ये दोन वेळा, आग्रा, अलाहाबाद आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एकदा आजोबांसोबत फाशी देण्यावेळी हजर होते.

फाशी देण्याआधी घेतली जाते ट्रायल

पवन जल्लाद यांनी कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्यापूर्वी तेथील सर्व व्यवस्थेची ट्रायल घेतली जात असल्याचे सांगितले. गुन्हेगाराच्या वजनाइतके रेती पोत्यात भरून ते पोते गळफासात अडकवले जाते. गळफास मजबूत आहे किंवा नाही, वजनामुळे तो तुटत तर नाही ना, हे पाहण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. तसेच, फाशी देण्यासाठी खास दोरीचा उपयोग केला जातो. गळफास तयार करण्यासाठीही तयारी आवश्यक असते. ज्या ठिकाणी फाशी घर असते, तेथील लीव्हर वगैरे इतर यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे किंवा नाही, हे पाहिले जाते.

फाशी देतेवेळी गुन्हेगाराचे हात-पाय बांधले जातात

फाशी देण्याच्या आधी गुन्हेगाराचे हात-पाय बांधले जातात. त्याचे तोंड कपड्याने झाकले जाते. त्यानंतर त्याच्या गळ्यात गळफास अडकवला जातो. यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी इशारा करताच फाशी घराचा लीव्हर दाबला जातो. यानंतर गुन्हेगार ज्या प्लॅटफॉर्मवर उभा असतो, तो खालच्या बाजूला एका झटक्यात खेचला जातो आणि गुन्हेगार गळफासात अडकतो. काही वेळातच त्याचा मृत्यू होतो. अशा प्रकारे फाशीची शिक्षा दिली जातो.

पवन यांना सरकारकडून हवी आहे आर्थिक मदत

पवन जल्लाद यांना सध्या सरकारकडून दरमहा ₹5000 मानधन म्हणून मिळतात. इतक्या कमी रकमेत त्यांचा घरखर्च चालू शकत नाही. त्यांनी आपल्याला ₹20,000 रुपये मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे. तसेच, मुलांना सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. घरखर्च चालवण्यासाठी सध्या पवन सायकलवरून फिरून गावात कपड्यांची विक्री करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची असून आपल्या कुटुंबाचे जेततेम पालनपोषण करत असल्याचे पवन यांनी म्हटले आहे.

पहिल्यांदा चौघांना एकत्र फाशी

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे. या चौघांना एकाच वेळी फाशी दिली जाईल, असे मानण्यात येत आहे. असे झाल्यास चार जणांना एकाच वेळी फाशी देण्याची ही पहिलीच वेळ असेल. यामुळे देशाच्या इतिहासात घटना कायमची लिहिली जाईल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत एकदाही चार जणांना एकाच वेळी फाशी दिलेली नाही. मात्र, एका वेळी दोघांना फाशी दिल्याची घटना पतियाळा येथे घडली होती, अशी माहिती पवन जल्लाद यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details