नवी दिल्ली :कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' (NEET), आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा 'जेईई' (JEE) या १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी एक ट्विट करून यासाठीची घोषणा केली आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच आम्ही यासाठीचे नियोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.