महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'साथीच्या आजारांसाठी आरोग्य धोरणाची आवश्यकता' - आयएमए

प्राणघातक परिस्थितीशी लढा देण्यासाठी 28 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात आयएमएच्या 1 हजार 700 शाखा आहेत. सरकार आणि लोकांच्या मदतीने आयएमएने आतापर्यंत 100 हून अधिक वेबिनार आयोजित केले आहेत. कोरोना संकटात नागरिकांकडून स्वतःची काळजी, प्राथमिक आणि दुय्य्म सेवा रुग्णालयातील डॉक्टरांद्वारे उपचार, या गोष्टी मृत्यू दर कमी करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत, असे पत्रकार परिषदेत आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले.

इंडियन मेडिकल असोसिएशन
इंडियन मेडिकल असोसिएशन

By

Published : Jul 10, 2020, 8:09 AM IST

नवी दिल्ली -इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) गुरुवारी केंद्र सरकारला कोविड आरोग्य धोरण तयार करण्याचे आवाहन केले. कोरोना संकटात नागरिकांकडून स्वतःची काळजी, प्राथमिक आणि दुय्य्म सेवा रुग्णालयातील डॉक्टरांद्वारे उपचार, या गोष्टी मृत्यू दर कमी करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत, असे पत्रकार परिषदेत आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले.

समुदाय प्रसारात संपूर्ण जिल्ह्याला एकक म्हणून मान्य करायला हवे. कोरोना रुग्णाला शोधण्यासाठी चाचणी आणि संपर्क ट्रेसिंगचे सार्वजनिक आरोग्य उपक्रम खबरदारी बाळगत चालू ठेवावे. लॉक-अनलॉक प्रक्रिया विकेंद्रित असायला हवी, असेही ते म्हणाले. इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात वैद्यकीय सेवांसाठी समान मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. जिल्हा पातळीवर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगच्या सहाय्याने लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून कोरोनाचे प्रमाण कमी करता येते, असे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले.

प्राणघातक परिस्थितीशी लढा देण्यासाठी 28 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात आयएमएच्या 1 हजार 700 शाखा आहेत. सरकार आणि लोकांच्या मदतीने आयएमएने आतापर्यंत 100 हून अधिक वेबिनार आयोजित केले आहेत. भारतीय डॉक्टरांचे मनोबल टिकवण्यासाठी त्यांचे सातत्याने समुपदेशन केले जात आहे. आतापर्यंत आपले प्राण गमावलेल्या किंवा या संसर्गाला बळी पडलेल्या डॉक्टरांची संख्या, आयएमएने त्यांची राष्ट्रीय कोविड नोंदवहीत नोंदवली आहे, असे आयएमएचे सरचिटणीस डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details