नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने श्रीलंकेत आलेल्या नव्या सरकारसह काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. नव्या सरकारसोबत चांगले संबंध प्रस्थापित करून नवी वाटचाल करण्यास तयार असल्याचे, मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, नवीन सरकार श्रीलंकेतील तामिळी बांधवांच्या हितांचे संरक्षण करून त्यांच्या मागण्याही पूर्ण करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्रीलंकेच्या नव्या सरकारसोबत काम करण्यास भारताची तयारी - परराष्ट्र मंत्रालय
श्रीलंकेत आलेल्या नव्या सरकारसोबत चांगले संबंध प्रस्थापित करून नवी वाटचाल करण्यास तयार असल्याचे, मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, नवीन सरकार श्रीलंकेतील तामिळी बांधवांच्या हितांचे संरक्षण करून त्यांच्या मागण्याही पूर्ण करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारताने पाकिस्तानात पकडण्यात आलेल्या २ नागरिकांपर्यंत राजकीय मदत पोहोचवण्याची मागणीही केली. प्रशांत वेंदम आणि धारी लाल अशी या नागरिकांची नावे आहेत. त्यांच्यापर्यंत न्यायिक सुविधा पोहोचाव्यात, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, या दोन नागरिकांना पाकिस्तानकडून त्रास दिला जाणार नाही आणि त्यांना सुरक्षितपणे भारताकडे सोपवण्यात येईल, अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली.
'भारतातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना कोलकाता येथे होणार आहे. भारत आणि बांग्लादेशची चांगली मैत्री असून बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) या सामन्याचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून भारतात कोलकात्याच्या दौऱ्यावर येणार आहेत,' असे रवीश यांनी सांगितले.