इंदौर -अमली पदार्थ तस्करांचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशातील इंदौर पोलीस गुजरात आणि महाराष्ट्रात धरपकड करत आहेत. एमडीएमए या अमली पदार्थच्या तस्करी विरोधात इंदौर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी फिरोज आणि लाला या तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आणखी काही आरोपींना अटक करण्यासाठी इतर राज्यात धाडी टाकत आहेत.
गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक शहरात पोलिसांची पथके रवाना झाली असून गुप्त माहितीच्या आधारे तस्करांवर पाळत ठेवून आहेत. लवकरच मोठी सफलता मिळणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील फिरोज गँग आणि गुजरात सीमेवरील लाला गँगबरोबर सरदार खानचे संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांना तपासादरम्यान अनेक पुरावे हाती लागले आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातमधील मोठे तस्कर पोलिसांच्या हाती लागतील, अशी माहिती मिळत आहे. सध्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध ठिकाणी पोलीस तस्करांच्या अड्डयांवर धाडी मारत आहेत. अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघड होणार असल्याच्या वृत्ताला मध्यप्रदेशचे पोलीस महानिरिक्षक हरिनारायण चारी मिश्र यांनी सांगितले.