नवी दिल्ली : एमडीएच मसाल्याचे मालक 'महाशय' धर्मपाल गुलाटी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. माता चंदनदेवी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गुलाटी यांना सर्व लोक 'दादाजी' आणि 'महाशयजी' नावाने ओळखत असत. १९२३मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये त्यांचा जन्म झाला होता. शाळा सोडल्यानंतर गुलाटी यांनी आपल्या वडिलांच्या मसाल्यांच्या व्यापारात लक्ष घातले. फाळणीनंतर ते सियालकोटमधून भारतात रहायला आले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये आपले मसाल्यांचे दुकान सुरु केले.
या दुकानाच्या जोरावर त्यांनी एमडीएच हा मसाल्यांचा मोठा व्यापार सुरू केला. सध्या देशभरात त्यांचे १५ कारखाने आहेत. २०१९मध्ये त्यांना भारताच्या नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
जगातील सर्वाधिक वयाचे सीईओ..