महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बसप आमदाराला सीएएचं समर्थन करणं पडलं महागात, मायावतींनी केलं निलंबित

बसपच्या एका आमदाराला सीएएचे समर्थन करणं चांगलेच महागात पडलं आहे. सीएएचं समर्थन केल्याने संबंधित आमदाराला मायावतींनी निलंबित केले आहे.

मायावती
मायावती

By

Published : Dec 29, 2019, 9:11 PM IST

नवी दिल्ली -नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनार्थ आणि विरोधात देशभरात आंदोलन होत आहे. यातच बसपाच्या एका आमदाराला सीएएचे समर्थन करणं चांगलेच महागात पडलं आहे. सीएएचं समर्थन केल्याने संबंधित आमदाराला मायावतींनी निलंबित केले आहे. बसपच्या प्रमुख मायावती यांनी ट्विट करत यांची माहिती दिली.

बसप शिस्तबद्ध पक्ष असून पक्षाचे नियम तोडल्यावर आमदार, खासदार यांच्यावर कारवाई केली जाते. याला अनुसरून मध्य प्रदेशमधील पथेरियाच्या बसप आमदार रमाबाई परिहार यांचे सीएएचे समर्थन केल्याप्रकरणी पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासही मनाई करण्यात आली आहे , असे मायावती यांनी टि्वट केले आहे.हेही वाचा -'राष्ट्रीय नागरिक नोंदणी हा भारताचा अंतर्गत विषय'

पथेरिया मतदारसंघाच्या आमदार रमाबाई यांनी सीएएचे समर्थन केले होते. सीएए लागू करण्याचा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होता. मात्र तो घेण्यात कोणी सक्षम नव्हते, असे रमाबाई यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सीएए कायदा लागू केल्याबद्दल मोदी आणि शाह यांचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details