बुडतेय मोदींची नाव, आरएसएसनेही सोडली साथ; मायावतींचा दावा - vjp
'जनतेची दिशाभूल करण्यासाठी सेवक, मुख्य सेवक, चहावाला, चौकीदार अशा रूपात नेत्यांना दाखवण्यात आले. मात्र, आता देशाला संविधानाच्या मार्गावर चालणारा 'शुद्ध' पंतप्रधान हवा आहे. आतापर्यंत बहुरुप्यांनी जनतेला फसविले आहे. आता जनता फसणार नाही,' असे मायावतींनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - बहुजन समाज पक्ष (बसप) अध्यक्ष मायावती यांनी भारतीय जनता पक्ष लोकसभा २०१९ ची निवडणूक हरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, आरएसएसने देखील भाजपला समर्थन करणे बंद केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
'मागील निवडणुकीत दिलेली आणि अपुरी राहिलेली आश्वासने आणि जनतेचे आंदोलन पाहून आरएसएसने आपल्या स्वयंसेवकांना निवडणुकीच्या कामाला लावलेले नाही. यामुळे मोदी त्रस्त आहेत. लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या भागात 'आर-या-पार' अशी स्थिती आहे. पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. आरएसएसने देखील त्यांची साथ सोडली आहे,' अशा आशयाचे ट्विट मायावतींनी केले आहे.
'जनतेची दिशाभूल करण्यासाठी सेवक, मुख्य सेवक, चहावाला, चौकीदार अशा रूपात नेत्यांना दाखवण्यात आले. मात्र, आता देशाला संविधानाच्या मार्गावर चालणारा 'शुद्ध' पंतप्रधान हवा आहे. आतापर्यंत बहुरुप्यांनी जनतेला फसविले आहे. आता जनता फसणार नाही,' असे मायावतींनी म्हटले आहे. यानंतर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी प्रियांका गांधींवरही निशाणा साधला. 'सध्या 'रोड शो' घेणे आणि प्रत्येक ठिकाणी पूजा-पाठ करणे हीदेखील फॅशन बनली आहे. यामध्ये मोठा खर्च केला जातो. निवडणूक आयोगाने हा खर्च त्या-त्या मतदार संघातील त्या पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मिळवावा.
मायावती यांनी 'भाजपमधील नेत्यांच्या पत्नी या नेत्यांच्या मोदींशी असलेल्या संपर्कामुळे घाबरल्या आहेत,' असे वक्तव्य सोमवारी केले होते. 'या महिलांना मोदींच्या संगतीमुळे आपला पती आपल्याला सोडून देईल,' याची काळजी वाटत आहे, असे त्यांनी म्हटले होते.