नवी दिल्ली - देशात भाजप-आरएसएस सारख्या शक्तींना रोखण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. काँग्रेसचे दोन्ही सर्वोच्च नेते पुन्हा या जागांवरून लढावेत आणि त्यांनी येथे जास्त अडकून पडू नये, असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
...म्हणून आम्ही अमेठी, रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या - मायावती - मायावती
देशात भाजप-आरएसएस सारख्या शक्तींना रोखण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत.
नवी दिल्ली
मायावती पुढे म्हणाल्या की, भाजपला याचा फायदा उत्तर प्रदेशच्या बाहेर कुठे जादा होऊ नये, हे विचारात घेऊनच महाआघाडीमध्ये आम्ही या दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडल्या. मला पूर्ण खात्री आहे की, महाआघाडीमधील एक-एक मत काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना मिळणार आहे.