महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'प्रियंका गांधींचा वाराणसी दौरा एक नाटक' - BSP chief Mayawati

संत रविदास जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत पोहोचल्या. त्यावरून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी प्रियंका गांधींवर हल्लाबोल केला आहे.

'प्रियंका गांधींचा वाराणसी दौरा एक नाटक'
'प्रियंका गांधींचा वाराणसी दौरा एक नाटक'

By

Published : Feb 9, 2020, 4:31 PM IST

नवी दिल्ली - संत रविदास जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत पोहोचल्या. त्यावरून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी प्रियंका गांधींवर हल्लाबोल केला आहे. 'काँग्रेस सत्तेमधून बाहेर पडल्यानंतर मंदिरात जाऊन वेग-वेगळ्या प्रकारची नाटकबाजी करत आहे. अश्यापासून सावधान राहा', असे मायावती यांनी टि्वट करून म्हटले आहे.

काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांनी त्यांची उत्तर प्रदेशमध्ये सरकार असताना कधीच संत गुरू रविदास यांना सन्मान दिला नाही. मात्र, सत्तेमधून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांना येथील मंदिरांची आठवण येते. आपल्या स्वार्थासाठी मंदिरात जाऊन नाटकबाजी करतात. अश्या लोकापासून सावध राहावे, असे मायावती यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा -आशियाई चित्ता होता भारताची ओळख, त्याची जागा आफ्रिकन चित्ता घेणार का?

दरम्यान प्रियांका गांधी ह्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. संत रविदास जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत पोहोचल्या. लाल बहादुर शास्त्री विमानतळावर त्यांचे आगमन झाले आहे. रविदास मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या सत्संगात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधींचा हा दुसरा दौरा आहे. याआधी त्या सीसीए विरोधी तुरुंगात टाकलेल्या आंदोलकांना भेट देण्यास वाराणसीत आल्या होत्या.

हेही वाचा -काश्मीरमध्ये २ जी इंटरनेट सेवा पुन्हा बंद; जेकेएलएफवर हिंसा भडकावल्याचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details