महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये रसायनाच्या कारखान्याला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

रसायन कारखान्याची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले आहे. घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

आगीने झालेला धूर
आगीने झालेला धूर

By

Published : Aug 8, 2020, 2:53 PM IST

Updated : Aug 8, 2020, 4:25 PM IST

अहमदाबाद- गुजरातमध्ये रसायनाच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 11 वाजता घडली आहे. ही भीषण आग गांधीनगरमधील वापी या औद्योगिक भागात जीडीआयसी या जैविकतंत्रज्ञान कंपनीत लागली आहे.

रसायन कारखान्याची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले आहे. घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे समजते. आग लागलेल्या कारखान्याच्या परिसरात धुराचे मोठे लोट निर्माण झाले आहेत. या आगीने संपूर्ण कंपनीला वेढले होते. कंपनीमध्ये कोणताही कामगार काम करत नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळू शकली आहे.

आगीनंतर कंपनीमध्ये असलेल्या बॉयलर आणि ड्रममधील रसायनांचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली. वापी नगरपालिका, दमस, सेलवास आणि स्थानिक कंपन्यांनी अग्नीशामक दलाला घटनेची माहिती कळविली. आगीच्या घटनेनंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन विभागाने आग विझविण्यासाठी पाणी आणि फोमचा वापर केला.

पोलिसांनी खबरदारी म्हणून परिसरातील कंपनीमधून कामगारांना बाहेर काढण्यात आली. अग्नीशमन विभागाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, कंपनीत ज्वलनशील रसायन असल्याने आग तीन तासानंतरही आटोक्यात आली नाही.

Last Updated : Aug 8, 2020, 4:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details