महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाचा हवेतून प्रसार होत असल्याचे पुरावे समोर; मास्क सर्वांना अनिवार्य हवे - सीएसआयआर

By

Published : Jul 9, 2020, 12:57 PM IST

Updated : Jul 9, 2020, 2:14 PM IST

कोरोना विषाणूचा प्रसार हवेतूनही होत असल्याच्या पुराव्याला जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला आहे. त्यामुळे मास्क घालणे सर्वांना अनिवार्य करायला हवे, असे कौन्सिल ऑफ साईन्टिफिक अ‌ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (CSIR) संस्थेच्या महासंचालकांनी म्हटले आहे.

डॉ. मांडे
डॉ. मांडे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार होत असल्याच्या पुराव्यांना नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे मास्क घालणे सर्वांना अनिवार्य करायला हवे, असे कौन्सिल ऑफ साईन्टिफिक अ‌ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (CSIR) संस्थेच्या महासंचालकांनी म्हटले आहे.

मास्क घालणे सर्वांना अनिवार्य हवे. जेव्हा तुम्ही बंद खोलीत असता तेव्हाही मास्क घालायला हवे. तुमच्या ऑफिसमध्ये हवा खेळती असायला हवी. तुम्ही बंद जागेत असाल तर तेथे हवा येईल, अशी व्यवस्था करा. जर खुल्या जागी असाल तर मास्क घाला आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असे डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रसार हवेतूनही होत असल्याच्या पुराव्याला जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला आहे. यासंबंधी 239 शास्त्रज्ञांनी डब्ल्युएचओला एक पत्र पाठविले होते. कोरोनाचा प्रसार हवेतील पाण्याच्या लहान थेंबांनीही होऊ शकतो, त्यामुळे उपाययोजना करण्याची विनंती शास्त्रज्ञांनी केली होती.

'जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या तोंडातून 5 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे एरोसोलस (सुक्ष्म पाण्याचे थेंब) बाहेर पडत असतात. ते हवेमध्ये तरंगत असतात. गर्दीच्या ठिकाणी जर कोणी कोरोना बाधित व्यक्ती असेल तर सुक्ष्म पाण्याच्या थेंबाद्वारे दुसऱ्यांनाही संसर्ग होऊ शकतो. बंद खोलीतही हवेत तरंगणाऱ्या लहान थेंबाद्वारे संसर्ग होण्याचा धोका आहे, असे डॉ. शेखर मांडे म्हणाले.

Last Updated : Jul 9, 2020, 2:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details