महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हुतात्मा जवानाच्या बहिणीचा नेत्रदिपक विवाह सोहळा; सीमेवरील जवानांनी पार पाडली भावाची जबाबदारी - पंजाब

विवाह सोहळ्यानंतर झालेल्या पाठवणीवेळी जवानांनी भावाची कमी पडू न देता तिचे प्रत्येक पाऊल हातावर घेतले. जिथे-जिथे नवरीचे पाऊल पडत त्या जागेवर तिचे पाऊल पडण्यापूर्वी जवान हात ठेवत होते.

नवरीचे पाऊल पडत त्या जागेवर तिचे पाऊल पडण्यापूर्वी जवान हात ठेवताना

By

Published : Jun 15, 2019, 5:05 PM IST

पाटणा- बिहारमध्ये रोहतास येथे झालेला विवाह सोहळा सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. या विवाह सोहळ्यात नवरीची पाठवणी अनोख्या पद्धतीने करण्यात आली. नवरीची पाठवणी करताना भारतीय जवानांनी चक्क तिचे पाऊले हातात घेतली. अशा पद्धतीने झालेल्या या नवरीच्या पाठवणीची चर्चा सर्वत्रच रंगत आहे.

हुतात्मा जवानाच्या बहिणीची प्रतिक्रिया
ज्योति प्रकाश निराला

भारतीय वायुसेनेतील गरुड कमांडो असलेल्या ज्योति प्रकाश निराला यांना दोन वर्षांपूर्वी वीरमरण आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना त्यांनी प्राणाची बाजी लावली होती. त्यांच्या साहसासाठी त्यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते. ज्योति प्रकाश यांना ३ बहिणी आहेत. यापैकी शशिकलाचा काल (शुक्रवार) विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगढ आणि दिल्ली येथील ज्योति प्रकाश यांच्या कित्येक सहकारी जवानांनी हजेरी लावली होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ज्योति प्रकाश यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करताना

ज्योति प्रकाश यांची बहिण असलेल्या शशिकलाच्या विवाह सोहळ्यात कशाचीही कमी पडू द्यायची नाही, असे जवानांनी ठरवले होते. विवाह सोहळ्यानंतर झालेल्या पाठवणीवेळी जवानांनी भावाची कमी पडू न देता तिचे प्रत्येक पाऊल हातावर घेतले. जिथे-जिथे नवरीचे पाऊल पडत त्या जागेवर तिचे पाऊल पडण्यापूर्वी जवान हात ठेवत होते. सहकारी जवानांनी एवढेच नाही तर, विवाह सोहळ्याचा खर्चही उचलला. महत्वाचे म्हणजे शशिकलाचा विवाह लोको पायलट असलेल्या सुजीत यांच्यासोबत झाला आहे. तेही वीरमरण आलेल्या जवानाच्या बहिणीशी विवाह करुन खूश आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details