महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एस्सारच्या दंतेवाडा प्लांट येथे माओवाद्यांनी ट्रक, एक्सकेव्हेटर पेटवले - dantewada

'५० माओवाद्याचा एक गट या ठिकाणी आला. त्यांनी खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे ट्रक आणि एक्सकेव्हेटर पेटवले. यावेळी चालक आणि क्लिनर यांना काम न करण्यासाठी धमकावण्यात आले,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

माओवाद्यांकडून आगडोंब

By

Published : May 15, 2019, 1:55 PM IST

दंतेवाडा - छत्तीसगडमध्ये एस्सारच्या दंतेवाडा प्लांट येथे माओवाद्यांनी ३ ट्रक आणि एक्सकेव्हेटर पेटवले. ही वाहने एस्सार कंपनीच्या किरंडूल येथील प्लांटमध्ये 'डस्ट वेस्ट' जमा करण्याचे काम करत होती.

'५० माओवाद्याचा एक गट या ठिकाणी आला. त्यांनी खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे ट्रक आणि एक्सकेव्हेटर पेटवले. तसेच चालक आणि क्लिनर यांना काम न करण्यासाठीही धमकावण्यात आले. या गटाला पकडण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवत आहेत,' अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. माओवाद्यांच्या 'मालांगीर परिसर समिती'चे हे कृत्य असण्याची शक्यता प्राथमिक चौकशीनंतर व्यक्त करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details