महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भीषण अपघातात ट्रक आणि बस जळून खाक, दहा ठार! पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक.. - उत्तर प्रदेश बस अपघात

या बसमध्ये साधारणपणे 43 प्रवासी होते. त्यांपैकी 21 लोकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांपैकी 13 लोकांना तिरवा येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत आठ ते दहा लोक ठार झाल्याची माहिती मिळत आहे..

UP Kannauj Bus Accident
भीषण अपघातात ट्रक आणि बस जळून खाक; आठ जण जागीच ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता..

By

Published : Jan 11, 2020, 1:18 AM IST

Updated : Jan 11, 2020, 7:44 AM IST

7.00 AM :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत पावलेल्या लोकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच, यातील जखमी लवकरच बरे होतील अशी मी कामना करतो, या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यामध्ये खासगी बस आणि ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बसला आग लागल्यामुळे बसमधील आठ ते नऊ प्रवासी हे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर किमान २२ लोक या अपघातात जखमी झाले आहेत.

भीषण अपघातात ट्रक आणि बस जळून खाक; आठ जण जागीच ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता..
उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत बस जळून खाक..

फर्रुखाबादहून जयपूरला जाणाऱ्या एका स्लीपर बसची, उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यातील घिलोई गावाजवळ एका ट्रकशी टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये ट्रक आणि बस दोन्हींना भयंकर आग लागली. झटक्यातच आग पसरल्यामुळे बसमधील लोकांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. या घटनेदरम्यान बसमधील काही प्रवासी मात्र ऐनवेळी बाहेर पडण्यास यशस्वी झाले. मात्र, किती लोक यामध्ये बाहेर पळून गेले आहेत याबाबत अद्यापही निश्चित माहिती समोर आली नाही.

पोलीस महानिरिक्षक मोहित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये साधारणपणे आठ ते नऊ लोक जागीच ठार झाले आहेत. त्यांची डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर कन्नौजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये साधारणपणे 43 प्रवासी होते. त्यांपैकी 21 लोकांना उपचारासाठी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांपैकी 13 लोकांना तिरवा येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना दोन लाख, तर जखमींना 50 हजार रूपये मदत त्यांनी जाहीर केली आहे.

हेही वाचा : 'माझ्यावर हल्ला झाल्याचा पुरावा माझ्याकडे आहे' आयेशी घोषकडून आरोपांचे खंडन

Last Updated : Jan 11, 2020, 7:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details