मनाली (हि.प्र)- हिमवर्षाव आणि पावसामुळे हजारो नागरिक मनालीत अडकले आहे. प्रतिकूल वातावरणामुळे पतलीकूहलच्या पुढे कुल्लू-मनाली महामार्ग आणि नग्गरच्या पुढे वामतट मार्ग हा बस आणि छोट्या वाहनांसाठी बंद झाला आहे. मात्र, मनाली ते पतलीकूहलच्या दरम्यान जिप्सी आणि टैक्सींची ये-जा सुरू आहे. परंतु, टॅक्सी चालकांकडून प्रवाशांकडून जादा भाडे घेतले जात आहे. म्हणून अशा टॅक्सी चालकांवर आरटीओ आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
हिमवर्षावामुळे हजारो नागरिक मनालीत अडकले; जादा भाडे वसूलनाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई
टॅक्सी चालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक आरटीओ आणि पोलिसांचे संयुक्त पथक बनविण्यात आले आहे. पथकाकडून पतलीकूहल येथे सातत्याने वाहनांचे तपास केले जात आहे. पोलीस पथकाने १४ गाड्यांचे चालान फाडून १३ हजार ५०० रुपयांची वसूली केली आहे.
टॅक्सी चालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक आरटीओ आणि पोलिसांचे संयुक्त पथक बनविण्यात आले आहे. पथकाकडून पतलीकूहल येथे सातत्याने वाहनांचे तपास केले जात आहे. पोलीस पथकाने १४ गाड्यांचे चालान फाडून १३ हजार ५०० रुपयांची वसूली केली आहे. दरम्यान, टॅक्सी चालकांनी हिमवर्षावाच्या वेळी प्रवाशांकडून जादा भाडे आकारू नये, अशी सूचना देण्यात आल्याचे कुल्लूचे सहपोलीस अधीक्षक राजकुमार यांनी सांगितले आहे. मनाली आणि परिसरातील इतर ठिकाणी स्नो प्वॉइंट येथे हिमवर्षाव होत असल्याने लाखोंच्या संख्येने प्रवाशी मनाली येथे दाखल होते आहे. त्यामुळे मनालीतील हॉटेलही भरून गेली आहेत. पोलीस प्रशासनाकडून टॅक्सी चालकांवर केलेल्या कारवाईमुळे मनालीत मौजमस्ती करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा-निर्भया प्रकरण: दोषी विनय कुमारने दाखल केली 'क्युरेटीव्ह पिटीशन'