बंगळुरु - आय मॉनेटरी अॅडव्हायझरी (आयएमए) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मोहम्मद मन्सूर खान याच्या कोठडीमध्ये 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून मन्सूरची चौकशी केली जात आहे.
आय मॉनेटरी अॅडव्हायझरी या नावाने इस्लामिक बँक चालवणारा मोहम्मद मन्सूर खान कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेला होता. त्याला आयएमए घोटाळ्याप्रकणी एसआईटीने अटक केली होती.
देशातील २३ हजारांहून जास्त लोकांची फसवणूक करुन मोहम्मदने भारतातून पळ काढला होता. बंगळुरुमध्ये मोठे रिटर्न्स मिळवून देतो असे सांगत त्याने हजारो लोकांना गंडा घातला होता. बंगळुरु शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. मात्र त्यापुर्वी त्याने भारत सोडून पळ काढला.
काही दिवसांपूर्वी मोहम्मदने एक व्हिडिओ शेअर केला होता. 'मी देश सोडून मोठी चूक केली. मात्र त्यावेळची परिस्थिती तशी होती की देश सोडून जाव लागले,' असे स्पष्टीकरण दिले होते.