नवी दिल्ली -राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पक्षांकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप सामान्य माणसांसाठी काम करत आहे. तर आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचे आणि बस पेटवण्याचे काम करत आहे, असे ते म्हणाले.
तिवारी यांनी शहरात पदयात्रा केली. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील पदयात्रा करणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
भाजप 48 पेक्षा जास्त जागांवर विजय प्राप्त करणार आहे. ही दिल्लीच्या भाग्याची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष देशाच्या हितासाठी काम करत आहे. अर्थसंकल्पामध्येही केंद्र सरकारने 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कर शुल्कात सूट दिली आहे, असे तिवारी म्हणाले.