महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडलेले , मनोज तिवारींचा निशाणा - Rahul Gandhi's mentally disturbed

काँग्रेस पक्षाचे नेत राहुल गांधीनी शनिवारी वायनाडमध्ये खळबळजनक वक्तव्य केले.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Dec 8, 2019, 8:02 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचे नेत राहुल गांधी यांनी शनिवारी वायनाडमध्ये खळबळजनक वक्तव्य केले. एका सभेला संबोधित करत असताना त्यांनी भारताला जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी म्हटले आहे. या वक्तव्यावरून भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, अशी टीका केली आहे.


'राहुल गांधी भारताचा गौरव करू शकत नाहीत आणि झालेला पाहू शकत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांच्या विधानांमधून असे वाटते की, त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांसाठी चुकीचा शब्द वापरला होता, त्यानंतर त्यांना न्यायालयात माफी मागावी लागली होती', असे मनोज तिवारी म्हणाले.


हैदराबाद आणि उन्नाव येथे मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. उन्नावमधील पीडितेचा शनिवारी मृत्यू झाला. महिलांवरील या अमानवीय अत्याचाराविरोधात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी याच मुद्यावरून भाजपवर टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details