मुख्यमंत्री पर्रिकर खूप आजारी, बरे होण्याची चिन्हे नाहीत - मायकेल लोबो - मुख्यमंत्री पर्रिकर
'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर खूप आजारी आहेत. ते बरे होण्याची चिन्हे नाहीत,' असे उपसभापती आणि कलंगुटचे भाजप आमदार मायकेल लोबो यांनी म्हटले आहे. 'काल रात्री पर्रिकरांची तब्येत खूपच बिघडल्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे सतत लक्ष ठेऊन आहेत. मात्र, ते कधी बरे होतील, हे सांगता येत नाही,' असे लोबो यांनी म्हटले आहे.
पणजी - 'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर खूप आजारी आहेत. ते बरे होण्याची चिन्हे नाहीत,' असे उपसभापती आणि कलंगुटचे भाजप आमदार मायकेल लोबो यांनी म्हटले आहे. 'काल रात्री पर्रिकरांची तब्येत खूपच बिघडल्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे सतत लक्ष ठेऊन आहेत. मात्र, ते कधी बरे होतील, हे सांगता येत नाही,' असे लोबो यांनी म्हटले आहे.
'आम्ही सर्वजण पर्रिकर बरे व्हावेत, यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहोत. मात्र, ते खूप आजारी आहेत. मात्र, गोव्याच्या नेतृत्वात बदल होणार नाही. पर्रिकर हेच मुख्यमंत्री राहतील. तसेच, नवा नेता घ्यायचा झाला तरी तो भाजपचाच असेल,' असे लोबो यांनी सांगितले.
'पर्रिकर यांच्या तब्येतीत चढ-उतार होत होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे,' असे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले होते. त्यानंतर थोड्याच वेळाने लोबो यांनी ही माहिती दिली आहे. शनिवारी भाजप आमदारांची पणजी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. पर्रिकरांची प्रकृती आणि पुढील लोकसभा आणि विधानसभेची मोर्चेबांधणीकरण्यासाठी ही बैठक घेतली होती.