महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, म्हणाले... 'काश्मीरमधील मुली सूना म्हणून आणू' - सून

कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे सूना म्हणून आता काश्मीरातील मुलीही आणू शकतो', असे वादग्रस्त विधान मनोहर लाल खट्टर केले आहे. यांनी

manohar lal said now we can bring kashmiri daughter in law

By

Published : Aug 10, 2019, 8:08 PM IST

फतेहाबाद - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विषेश दर्जा देणारे ३७० कलम रद्द केले आहे. तसेच राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर हरियाणाच्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ' कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे सूना म्हणून आता काश्मीरातील मुलीही आणू शकतो', असे वादग्रस्त विधान केले आहे.


'राज्यात मुलींची संख्या घटली असून मुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली कमी पडल्या तर बिहारमधील मुली सून म्हणून आणू, असे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री ओपी धनखड म्हणायचे. तर आता जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केले आहे. त्यामुळे लोक म्हणत आहेत की, काश्मीरमधील मुली सूना म्हणून आणू, असे वादग्रस्त विधान खट्टर यांनी केले आहे.

भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, म्हणाले... 'काश्मीरमधील मुली सूना म्हणून आणू'


स्त्रीभ्रुण हत्या आणि घटत्या लिंगगुणोत्तरामुळे हरियाणा कुप्रसिद्ध झाला होता. मात्र, बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनामुळे राज्यातील एक हजार पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ८५० वरून ९३३ इतके वाढले, असेही ते म्हणाले.


मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर भाजपाचे नेते आहेत. वादग्रस्त विधानामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षी बलात्काराच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details