नवी दिल्ली - माध्यमांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावर कठोर पावले उचलले आहेत. मात्र, मोदी हे सगळं निवडणूकीत फायदा मिळण्यासाठी करत आहेत, असे मी मुलाखती दरम्यान म्हणाले होते. अशी प्रतिक्रिया शिला दीक्षित यांच्याकडून आज देण्यात आली.
मनमोहन सिंग टीका प्रकरण : माध्यमांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास - शीला दीक्षित - शीला दीक्षित
दहशतवादाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगापेक्षा जास्त कठोर आहेत, असे शीला दीक्षित यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देत असताना म्हटले असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले होते.
दहशतवादाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगापेक्षा जास्त कठोर आहेत, असे शीला दीक्षित यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देत असताना म्हटले असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले होते.भाजप भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे राजकारण करत आहे. भाजप हे सर्व निवडणूकीत विजय मिळवण्यासाठी करत असल्याचेही मी मुलाखतीत म्हटले आहे, अशाही त्या यावेळी म्हणाल्या.
शिला दीक्षित यांना पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाकडून जैशच्या दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यासंबंधी मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, दहशवाद्यांविरोधी कारवाई करण्यात मनमोहन सिंहापेक्षा नरेंद्र मोदी जास्त प्रभावी होते. नरेंद्र मोदी यांनी ज्या तत्परतेने पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली. त्याच तत्परतेने किंवा तेवढी कठोर कारवाई मनमोहन सिहांनी २६/११ च्या हल्ल्यानंतर केली नाही, अशाही त्या यावेळी म्हणाल्या, असे एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.