नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशामध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढत असल्याचे म्हटले आहे. देशात जातीय ध्रुवीकरण आणि हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यावरुन सिंग यांनी चिंता व्यक्त केली.
देशामध्ये असहिष्णुता व जातीय ध्रुवीकरणासह झुंडशाही वाढतेय - मनमोहन सिंग
काही ठराविक गटांकडून हिंसा आणि द्वेष पसरवला जात आहे. झुंडशाहीमुळे फक्त देशाचे नुकसान होईल, असे सिंग म्हणाले.
मागील काही दिवासांपासून देशात विचित्र पांयडे पडत असल्याचेही सिंग म्हणाले. काही ठराविक गटांकडून हिंसा आणि द्वेष पसरवला जात आहे. झुंडशाहीमुळे फक्त देशाचे नुकसान होईल, असे ते म्हणाले. भाजप सरकारच्या काळात वाढलेल्या झुंडशाहीच्या घटनांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.
देशामध्ये मागील काही दिवसांपासून गोमांस आणि जय श्रीराम घोषणा देण्यावरुन अनेक जणांना मारहाण करण्यात आली. यामध्ये काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार राज्यामध्ये झुंडबळीच्या घटाना मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत.