महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपच्या सभेत आरोपी स्टेजवर; मंजू वर्मा करतायेत गिरिराज सिंहांचा प्रचार - गिरिराज सिंह

गेल्या वर्षी बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणामध्ये तेथे राहणाऱ्या जवळपास ३५ ते ४० अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. तर, अनेक मुली या बालिकागृहातून या प्रकरणात बालिकागृहाचे संचालक ब्रिजेश कुमार मुख्य आरोपी आहे. तर, या संचालकाला मंजू वर्मा यांनी वेळोवेळी मदत केली, असे म्हटले जाते.

गिरिराज सिंह आणि मंजू वर्मा

By

Published : Mar 31, 2019, 1:53 PM IST

Updated : Mar 31, 2019, 2:25 PM IST

पाटणा -मुजफ्फरपूर बालिकागृह प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा भाजपच्या प्रचार सभेत दिसल्या. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या सोबत त्या स्टेजवर बसलेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या काळात या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणामध्ये तेथे राहणाऱ्या जवळपास ३५ ते ४० अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. तर, अनेक मुली या बालिकागृहातून या प्रकरणात बालिकागृहाचे संचालक ब्रिजेश कुमार मुख्य आरोपी आहे. तर, या संचालकाला मंजू वर्मा यांनी वेळोवेळी मदत केली, असे म्हटले जाते. त्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला होता.

मंजू वर्मा हसताना आणि गिरिराज सिंह संबोधन करताना

गिरिराज सिंहांना भाजपने बेगुसराय लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यामुळे गिरिराज सिंह पक्षावर नाराज होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते येथून निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. त्यांनतर शनिवार पासून त्यांनी या क्षेत्रात सभा घेणे सुरू केले आहे. त्यामध्ये मंजू वर्माही उपस्थित होत्या. त्या केवळ तेथे उपस्थितच नाही तर चक्क स्टेजवर बसल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गिरिराज सिंहाना येथून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैया कुमार यांचे आव्हान आहे. तर, बिहाच्या माहाघाडीनेही येथून आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता तयार झाली आहे. तर, मंजू वर्मा यांच्या प्रकरणामुळे भाजपवर काय परिणाम होणार हे पाहण्यासारखे झाले आहे.

Last Updated : Mar 31, 2019, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details