नवी दिल्ली - नांदेडवरून पंजाबला गेलेल्या शीख समुदायातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसे नेते दिग्विजय सिंह यांनी शीख समुदायाची तुलना तबलिगी जमातशी केल्यानंतर शीख समुदायामध्ये नाराजी पसरली आहे.
'दिग्विजय सिंह यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासणार' - पंजाब कोरोना संसर्ग
दिग्विजय सिंह यांच्यासह संपूर्ण काँग्रेस पक्षाने शीखांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अन्यथा तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा शीख गुरुद्वारा प्रबंधन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिला आहे.
दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यानंतर दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी तोंडाला काळे फासण्याचे वक्तव्य केले आहे. दिग्विजय सिंह यांच्यासह संपूर्ण काँग्रेस पक्षाने शीखांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अन्यथा तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नांदेड येथून परतलेल्या काही शीख नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केले होते. शीख भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पंजाब राज्यामध्ये धोका निर्माण झाला आहे. याची तबलिगी मरकजशी तुलना केली जाऊ शकते का? असा प्रश्न त्यांनाी उपस्थित केला होता. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर शीख समुदायामध्ये रोष उत्पन्न झाला आहे.