महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'अबकी बार-चोरी छिपे शपथ सरकार,' मनीष सिसोडियांचा भाजपला टोला - हरियाणा और महाराष्ट्र दोनों को मुबारक

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 'अबकी बार-चोरी छिपे शपथ सरकार,' असे ट्विट केले आहे. तसेच, हरियाणा आणि महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसाठी भाजपला उपरोधिक शुभेच्छा (हरियाणा और महाराष्ट्र दोनों को मुबारक) दिल्या आहेत.

मनीष सिसोडियांचा भाजपला टोला

By

Published : Nov 23, 2019, 5:58 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रात शनिवारी सकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. भाजपने एका रात्रीत बाजी पलटवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. या नाट्यमय घडामोडींनंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 'अबकी बार-चोरी छिपे शपथ सरकार,' असे ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या घडामोडी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भल्या सकाळी झालेल्या शपथविधीनंतर विविध क्षेत्रांतून आणि नागरिकांमधूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 'अबकी बार-चोरी छिपे शपथ सरकार,' असे ट्विट केले आहे. तसेच, हरियाणा आणि महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसाठी भाजपला उपरोधिक शुभेच्छा (हरियाणा और महाराष्ट्र दोनों को मुबारक) दिल्या आहेत.

विधानसभेच्या निकालानंतर सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या गोंधळात आज सकाळी मोठा निर्णय झाला. निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेच्या फेऱ्या काल रात्रीपर्यंत सुरू होत्या. मात्र, अजित पवारांच्यासोबतीने भाजपने सरकार स्थापन केले असून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details