महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मंडला : जिथे बापूंनी अस्पृश्यतेविरूद्ध उभारले होते मोठे आंदोलन - मंडला आंदोलन

स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान, महात्मा गांधी यांनी मध्य प्रदेशच्या मंडला गावामध्ये अस्पृश्यतेविरुद्ध मोठा लढा उभारला होता. पाहूया यामागची रंजक कथा...

Mahatma Gandhi

By

Published : Sep 18, 2019, 6:03 AM IST

भोपाळ - महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशाने संपूर्ण देशावर प्रभाव पडला. स्वातंत्र्य संग्रामादरम्यान लोक त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी कितीतरी लांबून पायी येत.

मंडला : जिथे बापूंनी अस्पृश्यतेविरूद्ध उभारले होते मोठे आंदोलन
६ डिसेंबर १९३३ला गांधीजींनी मध्य प्रदेशच्या मंडला गावाला भेट दिली. कारण होते, अस्पृश्यतेविरूद्ध उभारलेल्या आंदोलनाचे त्याच दरम्यान, गांधीजींना भेटण्यासाठी म्हणून, गण्णू भोई नावाचे व्यक्ती आपल्या चार हजार समर्थकांसह तब्बल १०४ किलोमीटर पायी चालत मंडलामध्ये आले होते. तेव्हा या आंदोलनामध्ये गांधीजींनी 'हरिजन' या शब्दाचा प्रयोग केला. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांविरूद्ध होणारा भेदभाव कमी करण्याकरीता हे आंदोलन केले गेले होते. गांधीजींनी यावेळी ज्याठिकाणी सभा घेतली होती, त्याच ठिकाणी आता गांधीजींचा एक पुतळा उभारला आहे. गांधीजींच्या स्मरणार्थ तिथेच एक वडाचे झाड देखील लावले गेले होते. जे आजही स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत उभे आहे.मंडलाच्या रंगरेझ घाटावर असलेला महात्मा गांधींचा पुतळा, आजही त्यांची शिकवण लोकांच्या स्मरणात ठेवतो. लोकांना अस्पृश्यता आणि भेदभावाविरूद्ध उभे राहण्यास प्रेरणा देतो. समाजाच्या एकत्रीकरणामध्ये गांधीजींच्या अहिंसावादाचं मोठे योगदान राहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details