नवी दिल्ली - उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मोठे यश मिळवत डॉन अबू सालेमचा साथीदार गजेंद्र सिंग याला अटक केली. गजेंद्रवर दिल्ली-एनसीआरमध्ये वसुली करणे आणि अबू सालेमच्या पैश्यांची गुंतवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राजकुमार मिश्रा यांच्या नेतृत्वात यूपी एसटीएफच्या ग्रेटर नोएडा युनिटने कुख्यात अबू सालेम आणि खान मुबारक यांच्या जवळचा सहकारी गजेंद्र सिंगला बुधवारी रात्री सेक्टर-20मधून अटक केली.
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सकडून अबू सालेमच्या साथीदाराला अटक - अबू सालेमच्या साथीदाराला अटक
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मोठे यश मिळवत डॉन अबू सालेमचा साथीदार गजेंद्र सिंग याला अटक केली. अबू सालेमची लोकांना भीती दाखवत त्याने वसुलीचे काम केल्याचा आरोप गजेंद्रवर आहे.
![उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सकडून अबू सालेमच्या साथीदाराला अटक गजेंद्र सिंग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12:28:16:1594882696-8045324-abu.jpg)
अबू सालेमची लोकांना भीती दाखवत त्याने वसुलीचे काम केल्याचा आरोप गजेंद्रवर आहे. गजेंद्र सिंगने 2014मध्ये दिल्लीतील एका व्यावसायिकाकडून या मालमत्तेच्या नावावर 1 कोटी 80 लाख रुपये घेतले होते. मात्र, पैसे परताव्याचा दबाव सुरू झाल्यावर गंजेद्र सिंगने संबधित व्यवस्यायिकाला ठार मारण्यासाठी खान मुबारकला 10 लाख रुपये दिले होते. त्या पैशाची ही माहिती उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सला मिळाली आहे.
दरम्यान 2005ला अबू सालेमचे पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध मुंबई बॉम्बस्फोटासह बेकायदा वसुली, खून, अशा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. अबू सालेम सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात शिक्षा भोगत आहे.