हैदराबाद- रुग्णवाहिका आणि ट्रकचा अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. विष घेतलेल्या व्यक्तीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात त्याच व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तेलंगाणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
विष घेतलेल्या व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात - हैदराबाद बातमी
विष घेतलेल्या व्यक्तीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात त्याच व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
![विष घेतलेल्या व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात विष प्राशन केलेल्या व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6947791-446-6947791-1587897946695.jpg)
विष प्राशन केलेल्या व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात
विष प्राशन केलेल्या व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात
रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला जाऊन धडकल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. येलारेड्डी येथील एका व्यक्तीने विष घेतले. काही व्यक्तिगत वादातून त्या व्यक्तीने हे पाऊल उचलले. यानंतर सदर व्यक्तीला येलारेड्डीपेट येथील रुग्णालयात नेत असताना हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.