नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील सिरोजमध्ये लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. लाच मागितल्यानंतर संबधीत शेतकऱ्याने पैसै नसल्यामुळे नायब तहसीलदार यांच्या गाडीला आपली म्हैस बांधली आहे.
मध्य प्रदेश : लाच मागितल्यानंतर शेतकऱ्याने नायब तहसीलदाराच्या गाडीला बांधली म्हैस - शेतकरी भूपेंद्र सिंह
मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील सिरोंजमध्ये लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे.
जिल्ह्यातील नायब तहसीलदार सिद्धार्थ सिंगला यांनी भूपेंद्र सिंह ह्या व्यक्तीला शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी 25 हजाराची लाच मागितली. यावर भूपेंद्र सिंह यांनी तहसील कार्यालय गाठले आणि आपली म्हैस तहसीलदारांच्या गाडीला बांधली. याचबरोबर एसडीएम यांना निवेदन देऊन सिंगला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -भोपाळ बोट दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू, पाहा बोट बुडतानाचा लाईव्ह व्हिडिओ
यापूर्वीही तहसीलदार सिद्धार्थ सिंगला यांच्यावर लाचखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे याकडे सतत दुर्लक्ष होत असून अधिकारी या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत.