लखनऊ (उत्तर प्रदेश) -राज्यातीलबांदा जिल्ह्यात 31 जानेवरी, 2018 रोजी पती-पत्नी व त्यांच्या दोन मुलांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली होती. यातील मुख्य आरोपीला अपर सत्र न्यायाधीश यांनी शुक्रवारी (दि. 6 नोव्हेंबर) फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर पुराव्याअभावी आरोपीचे मामा आणि आईची न्यायालयाने सुटका केली आहे.
- आठ वर्षीय मुलगी साक्षीदार
31 जानेवारी, 2018ला महादेव त्यांची पत्नी चुन्नी व त्यांची दोन मुले पवन व राजकुमार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. ही खुनाची घटना दाम्पत्याच्या आठ वर्षीय मुलगी राशीने पाहिली होती. त्यानंतर तिने सकाळी शेजारी राहणाऱ्या गोलू ऊर्फ अमितने या हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अमितला त्याच्या आई व मामासह अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू झाली. शुक्रवारी (दि. 6 नोव्हेंबर) न्यायाधीशांनी मुख्य आरोपी अमिला फाशी व 50 हजारांचा दंड ठोठावला. तर पुरव्यांअभावी आरोपीची आई व मामा यांची मुक्तता करण्यात आली.
- वहिनीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हत्याकांड