भोपाळ - मध्यप्रदेशातील इंदौर येथे एका व्यक्तीने आपल्या ३४ वर्षीय पत्नीला १०० रुपयांच्या मुद्रांकनावर 'तलाकनामा' लिहून पाठवलेला आहे. त्याद्वारे तिला तलाक मागितला जात आहे. मात्र, ती त्याच्यासोबत राहायला तयार आहे. त्यामुळे त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
मध्यप्रदेशात एकाने पत्नीला मुद्रांकनावर पाठवला तलाकनामा; महिलेची पोलिसात धाव - तलाकनामा
मध्यप्रदेशात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला १०० रुपयांच्या मुद्रांकन पाठवले आहे. त्यावर 'तलाक-ए-बाईन' असे लिहिण्यात आले आहे.
रेश्मा शेख असे या महिलेचे नाव आहे. तिला अॅलिना नावाने देखील ओळखले जात असून ती भोजपूरी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. गेल्या २०१६ मध्ये तिचा मुदास्सिर बेग या व्यक्तीसोबत प्रेमविवाह झाला. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. तिला दोन महिन्यांचा लहान मुलगा देखील आहे. त्यामुळे रेश्माला तिच्या नवऱ्यासोबतच राहायचे आहे. मात्र, तो तिच्यासोबत राहायला तयार नसल्याने त्याने १०० रुपयांचा मुद्रांकन पाठवले आहे. त्यावर 'तलाक-ए-बाईन' असे लिहिण्यात आले आहे. यानुसार रेश्माच्या नवऱ्याला तिच्यासोबत राहायचे नाही. त्याला तलाक हवा असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यासाठी तिने चंदननगर पोलिसांकडे न्याय मागितला. मात्र, तिचे प्रयत्न व्यर्थ गेले. त्यानंतर चंदनगर पोलिसांसोबत संपर्क केला असता, हा नवरा-बायको मधील वाद असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच लोकसभेमध्ये तिहेरी तलाकवर बंदी आणणारे विधेयक मंजूर झाले आहे. मात्र, या विधेयकाला अद्याप राज्यसभेची मंजुरी मिळाली नाही. मात्र, 'तलाक-ए-बाईन' हे 'तलाक-ए-बिद्दत' म्हणजे तिहेरी तलाकपेक्षा वेगळा असल्याचे मुस्लीम शरीयत कायद्याच्या तज्ज्ञांनी सांगितले.