नवी दिल्ली -देशात पुन्हा एकदा तिहेरी तलाकाची घटना समोर आली आहे. ही घटना उत्तराखंडमधील काशीपूर येथे घडली. पत्नीने मुलीला जन्म दिल्यामुळे पतीने तलाक दिला. पतीच्याविरोधात पत्नीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत पीडितेने आरोप केला आहे की, मुलाला जन्म देण्यास असमर्थ असल्यामुळे पतीने दुसऱ्या महिलेशी लग्न केले मला तलाक दिला.
उत्तराखंड : मुलगी झाल्याने पतीकडून पत्नीला तिहेरी तलाक - तिहेरी तलाक
देशात पुन्हा एकदा तिहेरी तलाकाची घटना समोर आली आहे. ही घटना उत्तराखंडमधील काशीपूर येथे घडली. पत्नीने मुलीला जन्म दिल्यामुळे पतीने तलाक दिला.
"माझ्या पतीने एका वर्षापूर्वी शहगुफ्ता नावाच्या महिलेशी छुप्या पद्धतीने लग्न केले आणि मला नुकतच त्याबाबत माहिती मिळाली. मी जेव्हा त्याच्या दुसर्या लग्नाचा निषेध केला, तेव्हा मला मारहाण केली. नंतर त्याने आम्हा दोघींना भाड्याच्या घरात आणले. एकत्र राहण्यासाठी आम्ही नकार दिल्यानंतर त्याने 17 जूनला आपल्या नातेवाईकांच्या समवेत मला तलक दिला, असेही महिलेने सांगितले.
माझे लग्न 9 वर्षांपूर्वी झाले होते. आम्हाला चार मुली आहेत. मात्र, सलग मुलींना जन्म दिल्यानंतर सासरच्या लोकांनी माझा छळही केला, असे पीडित महिलेने सांगितले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.