लखनऊ : उत्तर प्रदेशच्या दुधवा राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उद्यानाच्या व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या जंगलात ही व्यक्ती गुरे राखण्यासाठी गेली होती. या परिसरात गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा वाघाने माणसावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अवधेश यादव असे या व्यक्तीचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हे इतर गुराख्यांहून थोडे लांब बसले होते. यावेळी वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ते पाहताच इतरांनी दगड मारत, आरडाओरडा करत वाघाला हाकलून लावले. यादव यांच्यावर उपचार करण्यासाठी इतर लोक त्यांच्याजवळ पोहोचले. परंतु खूप उशीर झाला होता.