शाहदरा- येथील गांधी नगरातील कपिल शर्मा या व्यावसायिकाने यमुना नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कर्जाबाजारीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र कपिल शर्मा यांचा मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. बचाव पथकाकडून त्याचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिकाची यमुनेत उडी मारून आत्महत्या - sahdara
गांधी नगरातील कपिल शर्मा यांनी यमुना नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. कर्जाबाजारीमुळे ही आत्महत्या झाल्याचे समोस आले आहे. मात्र कपिल शर्मा यांचा मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.
कपिल शर्मा यांची दुचाकी गीता कॅालनीतील पुलावर लावण्यात आली होती. तर गाडीच्या कडेलाच पायातील चप्पल सोडण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी यमुना नदीत उडी घेतली. परिसरातील नागरिकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बोट क्लबच्या टीमसोबत शोधमोहीम सुरू केली. मात्र अद्याप कपिल यांचा मृतदेह सापडला नाही. पोलिसांची शोधमोहीम अजुनही सुरूच आहे.
कपिल शर्मा यांचा नेट तयार करण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायात घाटा होत असल्याने त्यांनी लाखोंचे कर्ज घेतले होते. मात्र ते फेडू शकले नाहीत. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 35 वर्षीय कपिल शर्मा विवाहित असून त्यांना दोन मुलेही आहेत. कपिल यांचे वडील गांधी नगर येथील मंदिरात पुजारी आहेत.