महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकात महिलेवर जीवघेणा अ‌ॅसिड हल्ला! - कर्नाटकात महिलेवर जीवघेणा अॅसिड हल्ला

केरळमधील तिरुवनंतपुरम शहरामध्ये एका महिलेवर अज्ञात तरुणाने अ‌ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Man hurls acid on sleeping woman in Kerala
Man hurls acid on sleeping woman in Kerala

By

Published : Apr 19, 2020, 9:01 AM IST

तिरुवनंतपुरम - केरळमधील तिरुवनंतपुरम शहरामध्ये एका महिलेवर अज्ञात तरुणाने अ‌ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात महिला भाजली असून, तिला तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

संबधित महिला टेक्नोपार्क येथील कंपनीतील कर्मचारी आहे. शनिवारी सकाळी महिला आपल्या घरी झोपलेली होती. त्यावेळी आरोपीने महिलेच्या घराच्या काचेच्या खिडक्या फोडल्या आणि तिच्यावर अ‌ॅसिड फेकले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details