चेन्नई- जवळपास शंभराहून अधिक महिलांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. सर्वात आधी आरोपी महिलेशी मैत्री करायचा आणि त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. कासी असे तरुणाचे नाव असून तो नगरकोईल येथील रहिवासी आहे. याचप्रकारे अनेक महिलांना फसवल्याचा आरोप कासी याच्यावर आहे.
अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना फसवणारा अटकेत - मदुराई बातमी
सर्वात आधी आरोपी महिलेशी मैत्री करायचा आणि त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. कासी असे तरुणाचे नाव असून तो नगरकोईल येथील रहिवासी आहे.
अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना फसवणारा अटकेत
कासी हा श्रीमंत घरातील मुलींना फसवायचा आणि त्यानंतर त्यांच्याशी मैत्री करायचा. मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचा, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.