अमेठी (उ.प्र) - शहरात एका ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चोरी केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या ताब्यात असतानाच रविवारी त्याचा मृत्यू झाला.
अमेठीत पोलीस कोठडीतील आरोपीचा संशयास्पद मृत्यू
राम अवतार पासी (व.३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांच्या गस्ती पथकांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याला ईनहाऊना चौकीत ठेवले होते. मात्र रविवारी त्याचा रहस्यमयी पद्धतीने चौकीत मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक ख्याती गर्ग यांनी पोलीस उपअधीक्षक तिलोक राजकुमार सिंह यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सदरील युवकाच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून तेथून अहवाल आल्यानंतरच युवकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे गर्ग यांनी सांगितले.