लखनौ-चंद्रयान २ शी संपर्क होत नसल्याच्या कारणावरून एक युवक गेल्या तीन दिवसापासून प्रयागराजच्या नैनी ठाणे क्षेत्रातील यमुना पुलावरील टॉवरवर तपस्या करत होता. या युवकाला टॉवरवरून खाली उतरविण्यात प्रशासनाला यश आले आहे. रजनिकांत असे टॉवरवर चढणाऱ्या युवकाचे नाव आहे. तो प्रयागराजच्या मेजा परिसरात वास्तव्यास आहे.
टॉवरची उंची जास्त असल्याने रजनिकांतला पुलावरून उतरविण्यासाठी प्रशासनाला अडचण येत होती. युवकाला खाली उतरविण्यासाठी प्रयागराजमध्ये टॉवर एवढी हायड्रोलिक मशीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे बनारस येथून हायड्रोलिक मशीन मागविण्यात आली आणि या मशिनच्या साहाय्याने रजनिकांतला टॉवरवरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्याला नैनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.