बंगळुरु - कर्नाटकातील हसन येथे एका व्यक्तीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. रमेश असे मृताचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मेहबूबला अटक केली असून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मारहाणीचा बदला घेण्यासाठी मेहबूबने पेट्रोल टाकून रमेशला पेटवून दिल्याचं पोलिसांनी सांगितले.
कर्नाटक : मारहाणीचा सूड घेण्यासाठी पेट्रोल टाकून जिवंत जाळले, आरोपी जेरबंद - हसन गुन्हेगारी न्यूज
कर्नाटकातील हसन येथे एका व्यक्तीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
रमेशने एका बारमध्ये मेहबूब नावाच्या व्यक्तीला मारहाण केली होती. तेव्हा मेहबूबने रमेशच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. संबधित घटना हसन जिल्ह्यातील होलनारासिपुरा शहराच्या बसस्थानकाच्या मागील भागात 9 ऑगस्टला मध्यरात्री घडल्याची माहिती आहे. दरम्यान, रमेशच्या मृत्यूनंतर ही घटना समोर आली आहे.
रमेश हा धुम्रपान आणि दारूच्या आहारी गेला होता. तो आपली सर्व कमाई दारू पिण्यावर खर्च करायचा. त्याच्या वागण्याला कंटाळून पत्नीही त्याच्यापासून विभक्त झाली होती. 9 ऑगस्टला रात्री तो बारमध्ये दारू घेण्यासाठी गेला. मात्र, त्यावेळी त्यांचे मेहबूबसोबत भांडण झाले आणि रमेशने त्याला जोरदार मारहाण केली. तेव्हा मारहाणीचा सूड घेण्यासाठी मेहबूबने मध्यरात्री रमेशच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. पेटल्यानंतर रमेशने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते. दरम्यान, 22 ऑगस्टला रमेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.