जयपूर - राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले, की गेल्या पाच वर्षांपासून हा बाप तिच्यावर अत्याचार करत होता. गुरुवारी रात्रीदेखील असाच प्रयत्न करत असताना, तिने कसाबसा तिथून पळ काढला, आणि जवळचे महिला पोलीस ठाणे गाठले. तिने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली, त्यानंतर शुक्रवारी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच, याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :धक्कादायक! भाजीत मीठ न टाकल्याने पत्नीची हत्या, पती फरार