नवी दिल्ली -तिगरी शहरामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मारहाण करून, तिला बळजबरी अॅसिड पाजल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी हा प्रकार घडल्यानंतर रूग्णालयात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी पतीविरोधात तक्रार दाखल केली.
प्रियंका असे या महिलेचे नाव आहे. त्या फरीदाबादच्या रोहतपूरच्या रहिवासी होत्या. सराई सेहतपूरमध्ये राहणाऱ्या रवी याच्याशी २०१८ला त्यांचा विवाह झाला होता. प्रियंकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी हा गेल्या कित्येक महिन्यांपासून तिला त्रास देत होता. तो तिला हुंड्याची करत मारहाणही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
तीन दिवसांपासून ठेवले होते उपाशी..
प्रियंकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला तीन दिवसांपासून उपाशी ठेवण्यात आले होते. तसेच शुक्रवारी रात्री तिला रवी आणि तिच्या सासू-सासऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यांनी तिला पायऱ्यांवरून ढकलून दिले. तसेच, तिला बळजबरी अॅसिड पाजण्यात आले, ज्यात तिचा मृत्यू झाला.