महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन वाढविण्यास ममता बॅनर्जी अनुकूल - भारत संचारबंदी

पंजाब, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांनी आधीच 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. संचारबंदी वाढविण्याचा पंतप्रधानांचा निर्णय योग्यच असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यानी ट्विटरवरून म्हटले आहे.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

By

Published : Apr 11, 2020, 11:44 PM IST

कोलकाता - पंतप्रधान मोदींनी आज(शनिवार) विविध केंद्रशासित प्रदेश आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही लॉकडाऊन वाढविण्यास अनुकूल आहेत.

पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांनी आधीच 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. संचारबंदी वाढविण्याचा पंतप्रधानांचा निर्णय योग्यच असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यानी ट्विटरवरून म्हटले आहे. मात्र, दिल्लीत संचारबंदी वाढविण्याची अधिकृत घोषणा केली नाही. पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढविण्याबद्दल चर्चा केली. त्यास आम्हीही अनूकूल आहोत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

देशात मागील 24 तासांत 1 हजार 35 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर 40 जण दगावले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 7 हजार 529 झाली आहे. तर 242 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details