नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी सलग पाचव्या दिवशी संप ठेवाल आहे. त्यामुळे राज्यासह देशातही आरोग्यसेवांवर विपरीत परिणाम होत आहेत. डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले नाहीतर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. यानतंर, त्यांनी बैठकीचे निमंत्रणही दिले होते. परंतु, डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले नव्हते. डॉक्टर ममतांच्या माफीवर अडून बसले आहेत.
ममतांनी संपावर बसलेल्या डॉक्टरांना पत्र लिहित डॉक्टरांना लवकरात लवकर संप मिटवावा, असे अपील केले आहे. कामावर रुजू झाल्यानंतर कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. परंतु, डॉक्टरांनी प्रत्युत्तरात त्यांना नवीन मागण्यांची लिस्ट दिली आहे. यावर, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात संपावर असलेल्या डॉक्टरांनी ममतांना ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. याबरोबरच त्यांनी ममतांना माफी मागण्यास सांगितले आहे. एम्सचे डॉक्टर म्हणाले, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, रविवारी १४ रुग्णालयात ओपीडी आणि सर्जरी बंद करणार आहोत.